ऐका, शांततेसाठी आम्ही अणुबॉम्ब बनवला!!!

मी चौथीत असताना गंधिजींचे सत्याचे प्रयोग हि त्यांची आत्मकथा वाचत होतो तेव्हाच रेडिओ वरुन भारताच्या शांततेसाठी’ तयार केलेल्या विध्वंसकारी अणुबॉम्ब चाचणीला चार वर्षे पूर्ण ही बातमी कानावर आली. हा अणुबॉम्ब काय प्रकार असतो हे तेव्हा मला कळाले नाही म्हणून इकडून तिकडून त्याच्याबद्दल माहिती काढली – कोणीतरी सांगितलं, तो एक असा बॉम्ब आहे की त्याने संपूर्ण पाकिस्तान एका फटक्यात गायब होऊ शकतो. (तेव्हा अणुबॉम्ब विषयी लोकांची हि कल्पना होती.) एकीकडे मी वाचत होतो अहिंसे बद्दल आणि दुसरीकडे ऐकत होतो ‘शांततेसाठी’ तयार केलेले या महा-विनाशकारी हत्यारा बद्दल. झालं, माझा माणसावरील अर्धा विश्वास तर इथेच मेला. मी ते पुस्तक तिथेच सोडून दिले.

पुढे प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवशी, माझ्या शाळेने ‘आम्ही सारे भारतीय एक आहोत!!’ असल्या फालतू शपता आमच्याकडून घेऊन शेवटी आमची जात पण यांच लोक्कांनी दाखल्यावर टाकायला लावली. प्रत्येक ५ वर्षाने घोषनांचे कर्कश आवाज ऐकले – पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊं असे ऐकत ऐकत मतदारांनी काही जबाबबदार व्यक्तीना संसदेत बसवले. आम्ही यांच्याकडे एक सुंदर देश मागितला होता पण चारित्र्य काळ पण कपडे मात्र पांढरे घालणार्यांनी शेवटी आम्हाला काय दिले, तर – धोका!!

थोडे मोठे झालो – गावातून बाहेर पडून शिक्षणासाठी शहरात आलो, तर इथे भलताच प्रकार पहिला. सोन्याचे दगड देवळात सुरक्षित होते, आणि शेजारच्या गल्लीत पोरीवर अत्याचार होत होते.

ह्या मोहमाये पासून दूर जाऊन थोडे अध्यत्मिकाचे धडे घयावे म्हणून ब्रह्मचारी पनाचे फुकट सल्ले देणाऱ्या बाबाचे पुस्तके वाचू लागलो, नंतर तोच बलात्कारी निघाला. थोडा फेर फटका मारावा म्हणून बाहेर आलो तर स्वःताला शाकाहारी म्हणवणारा एक सज्जन मला कसाई खाण्यात भेटला. आता तर मी कपाळावर हातच मारला. आता तर मला कळून चुकले होते कि – हा देश महान आणि येथील जनते चे मेंदू मात्र गहाण आहे. हि पृथ्वी गोल असेल आणि पण इथे तर सगळा झोलच आहे.

Advertisements

कर्म ३६!!!

जर एखाद्या प्रोफसर ने संस्था चालकाच्या हातात caliper दिली तर ह्या अडकीत्याने सुपारी कशी फोडायची असा उलट प्रश्न करू शकणारे ब्रम्हज्ञानी लोकांच्या हातात इंजिनीरिंग कॉलेजेस चालवायला दिलीत म्हणून आज ही कृत्रिम unemloyment आपण बघतोय – जबाबदार कोण? आमचेच बाप आज्जे, यांनी फक्त एका दारूच्या बाटली बदल्यात, जातीच्या नावावर, माझा ऊस त्यांच्या कारखान्यात जातो असे टुकार कारणे सांगून हे पोट सुटलेले शिक्षण सम्राट निर्माण केले –

आणि आज तुमचीच पोर ही कधी ही MIDC कधी ती MIDC, कधी हे IT PARK कधी ते IT PARK असे degree घेऊन घाबरलेले चेहरे करून फिरतात. Elon musk, steve jobs, शेक्सपिअर, टाटा, बिर्ला आणि कदाचित गांधी जी होण्याची औकाद तुमच्या पण पोरांत आहे, फक्त तुम्ही त्यांना नसलेल्या कामात – म्हणणे ह्या नौकरी साठी खेटे मारण्याचं कामात गुंतून ठेवलंय. आम्ही पण आमची औकाद विसरलो, आणि तुम्हाला तर कधी आठवण करून द्यायची गरज वाटली नाही.

कर्म तुमचे, फळ आम्हाला भेटत आहे.

हो, कारण पण तसेच आहे!!

“भारत असा देश आहे तिथे लोक देवींना पूजतात आणि महिलांचा सन्मान करत नाही.” हे वाक्य बऱ्याच वेळा ऐकले किव्हा वाचले तर असेलच? खरे पण आहे!!

लहानपणी आपण सगळे काही गोष्टी माहित नसल्यामुळे नादान पणे आईला प्रश्न करायचो, कि असंच का करायचं आणि नाही केलं तर काय होईल, ती म्हणायची देवी चा कोप होईल, देवी रागवेल. आपण घाबरायचो आणि शांत बसायचो. कोप हा काय प्रकार होता माहित नव्हता पण भीती वाटायची. देवांविषयी आम्हाला आदर होताच पण भीती पण घालवून दिली जायची. बर, ठीक आहे देवांच्या बाबतीत उलट प्रश करायचा नाही हे शिकलो आम्ही!!

आता महिलांना तर आपण देवीच मानतो तरी तिचा का सन्मान करत नाही? हा पण प्रश्न कधी तरी आला असेल ना तुमच्या मनात? तर असे आहे कि, जसे देवांची आपल्याला आदरयुक्त भीती मनात भरवली जाते तशी महिलांबाबत कधीच केली जात नाही. ह्या गोष्टीला आपण सगळेच म्हणजे महिला, पुरुष आणि बाकीचे सगळे तेवढेच जबाबदार आहोत.

कॉर्पोरेट जगात पुरुषा पेक्ष्या जास्त कौशल्य असूनही त्यांच्या पेक्ष्या काही महिलांना कमी पगार भेटतो – कारण कोणी तिला भीत नाही, कारण पण तसेच आहे म्हणजे boss ला पण माहित आहे ती काही बोलणार नाही म्हणजे कोप पावणार नाही, आणि ती पण तसेच करते कधी काही बोलतच नाही.

स्वतःचे काही स्वप्न असूनही मुला कडला पैसा पाहून बळजबरीने तिचे लग्न लाऊन दिले जाते, तिचे स्वप्न विकताना कोणाला भीती वाटत नाही कारण तसे चालू असताना ती काही बोलत नाही, ती कधी कोप पावत नाही. बस मध्ये तिला माहित आहे कि त्याची नजर कुठे आहे तरी ती कोपत नाही तर म्हणून त्याची पण नजर हटत नाही. हे फक्त काही उदाहरणे झाली, परिस्थिती काय आहे तुम्हाला पण माहीत आहे.

आपण सर्व पुन्हा हा प्रश्न करतो, “भारत असा देश आहे तिथे लोक देवींना पूजतात आणि महिलांचा सन्मान करत नाही.” तेव्हा प्रामाणिक पणे सांगा तुम्ही खरं तर ताकतीला नमन करतात, तुम्ही आतून भितात, कि देवी आहे कोप पावेल आणि उलट महिलांना खूप हलकी वागणूक देतात कारण परत इथे तुम्ही ताकतीचा (इथे ताकद म्हणजे ते चुकीचे आहे त्या विरुद्ध बोलणे असे गृहीत धरा) अभाव यामुळे असे करतात. हो, तसेच आहे!!

ती..!!

काय लिहावं काय कळेना, लिहल्याशिवाय आज झोप पण लागणार नाही, डोक्यात स्वतःच्या नशिबावर भयंकर राग आहे आणि हृदयात तेवढंच तुझ्यावर प्रेम. म्हणलं हजार वेळा तुझं इंस्टाग्राम प्रोफाइल चेक करण्यापेक्षा चल काहीतरी तुझ्यावरच लिहू. कुठून सुरु करू, ठीक आहे – डोळ्यापासून करूया – “तुझे डोळेे, जसे कि देवाची सर्जनशीलता… ” – ‘अरे हे खूप बोर होतंय, डोळे नको, सगळेच लेखक आणि कवी ते डोळ्यावरच का अडकतात त्यांचं त्यांनाच माहित. तू थोडीशी वेगळी आहे म्हणून आपण काहीतरी वेगळं करूया.’

“जसे केस तुझे घनदाट…” – ‘नाही हे नाही मेळ खात, केस नको लॉरिअल पॅरिस ची ad थोडी करायची मला तुज्यावर?’ ठीक आहे, लाल ओठ चालतील? का हसल्यावर होणारे ते गुलाबी गाल? पण पुन्हा म्हणलं अरे हे प्रेम आहे, शरीराचा काय संबंध यात – थोडं आत जा. ”तुझं छान हृदय असलं काहीतरी?’ नाही अजून आत! ‘तुझा पवित्र आत्मा – तुज्यात देव असल काही तरी सॉलिड?’

अरे हे सगळंच खूप अतिशयोक्ती होतंय. तू जशी चंद्राची कोर, मध्यरात्री लाजाणारी चांदणीे, शुक्र-नेपचून आणि नाचणारा मोर-पडणारा पाऊस हे पण लिहता येईल – पण म्हणलं मी काय गॅलिलिओ नाही आणि ना की हवामान खात. जसे हवामान खात्याने अंदाच चुकतात तसेच माझ पण चुकतात, लिहीताना, तुझ्या अदा विषयीे. गॅलिलिओ ला अवकाशाने मोहनी घातली होती, म्हणून त्याने जगाच्या बाहेर पण एक जग शोधल, आणि मी तुझ्यात.

आता थोडे फिल्मी, तू जाम भारी होती यार- जसे की, तू समोर दिसली तरी श्वास अडकायचा आणि हृदयात एवढी धडधड होत होती कि अंगात हार्ले डेव्हिडसन आल्या सारखी वाटायची. काय ते सेकंदाच आपले डोळे एकमेकांना मिळने आणि तिथेच माझ्या हृदयाची हालचाल शून्य होणे. तिथून पुढे तू ते हसून डोळे हळूच काढून घेणे आणि मग एवढी माझी अवस्था एवढी वाईट होणे कि मेंदूत पण काहीतरी धडधड जाणवणे. प्रेमात पडल्यावर डोकं काम करत नाही, आणि माणूस काही कामा चा राहत नाही – कामावरून आठवलं वेळ झाली, थांबावं लागेल. भलतंच काही तरी लिहून ठेवलंय – तू जर वाचलं तर आवडेल का नाही माहीत नाही!!

ते पहा रात्र जात नव्हती म्हणून लिहायला घेतलं आणि लिहता लिहता आता तर पहाट पण झाली. रात्र भिर्ती आहे, माझ्या प्रेमासारखी, काही सूर्य किरण पडल्यावर पळून जाऊ लागली.

आज कालच्या प्रेमाचं पण असच असत – ते रात्री एवढंच, आणि रात्रीच भरभरून येते – उजेडाची भीती वाटते त्याला, करण ते लोकांना दिसत. खूपच खरे असेल तर काय ते आपलं प्रेम दुपार पर्यंत टिकेल – बाकी बरोबर डोक्यावर रखरखत ऊन आल्यावर सावली पण पायाखाली गायब होऊन जाते तर तुझे काय भरोसा की तू टिकेल!!

मति भ्रस्ट!!!

आपल्या समाजाचा आणखी एक मूर्खपणाचा कळस, ‘मुलाचा स्वतःचा flat पाहिजे तरच आमची मुलगी त्याला’ …

स्वतःच घर असणं हे एक अत्यंत रोगट स्वप्न आहे. 70 ते 80 लाखाचा एखादा flat घेऊन त्याचे हप्ते आयुष्यभर फेडत बसने यात कशाचा शहाणपण सापडत लोकांना हे त्यांना त्यानचच माहीत आहे. एक सुरक्षित निवारा असावा यात काही दुमत नाही पण या बालिश हट्टापायी एका 25-27 वयाचा मुलाला त्याच्या पगाराचा अर्धा भाग फक्त घरासाठी लटकवत ठेवणे कितपत बरोबर आहे.

अस नाही की मुलाच्या घरच्यांना काही हौस असते मुलाला त्याचे स्वप्न अर्धवट सोडायला लावून दगडा मातीच्या बेड्यात जखडून ठेवायची, याच एकमेव कारण म्हणजे , मुलीची व बऱ्याच वेळेस मुलीच्या घरच्यांची requirement, demand or you may say prerequisite to be eligible to marry her.

मला मुलींना एक प्रश्न विचारावं वाटतो, हे गरजेचं आहे का एका मुलाची लायकी त्याच व्यक्तिमत्व, कर्तृत्व, स्वप्न, व आयुष्यात काहीतरी मोठं करायची खुमखुमी या वरून तपासली न जाता ती घराचा आणि गाडीचा EMI भरायची कुवत यासारख्या शूद्र गोष्टीवरून ठरावी. आणि अस असेल तर तुम्ही तुमची किंमत तुमच्या माणूस आकलन करण्याच्या क्षमतेतच ठरवत आहात.

अस पण होऊ शकत ना की ही फालतू गुंतवणूक त्याने दुसऱ्या व्यवसायात व गोष्टीमध्ये लावून उशिरा लग्नानंतर का असेना पण एका दमात ह्या गोष्टी खरेदी कराव्या, हप्ते न भरत बसता. होत असे आहे की, आजचे तरुण हे खूप लायक आणि ताकदवान (डोक्याने) आहे त्यांच्या पायात या EMI-LOAN आणि फालतू फॉर्मलिटीच्या बेड्या घालत बसने म्हणजे ना फक्त एक कुटंबाच पण देशाचं पण खूप मोठं नुकसान करण आहे. कित्तेक प्रतिभावान तरुण नोकरी सोडून त्यांच्या कल्पना खऱ्या करण्यास घाबरतात, कारण मागे असलेले हप्ते आणि कर्ज हे त्याचा आत्मविश्वास दरोरोज डीवचतात.

पालकांनो, लवकर लग्न लावून देऊन न संपणाऱ्या काल्पनिक युद्धात त्याला ढकळण्यापेक्षा, खऱ्या आयुष्याचं युद्धात आधी त्याला लढू तर द्या, जिंकू तर द्या.

Come-On अप्पा…❕❕ 🎓

‘अप्पा, please !!!’ जगातील एक सगळ्यात भोळा चेहरा डोळ्यांत थोडे पाणी, तो रडत होता म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी नव्हते तर तो कांद्याच्या शेड मध्ये उभा होता म्हणून, त्याचा वडलाकडे विनंती करत होता.
‘नाही, एकदा नाही म्हणल ना..!!’ अप्पा पेपर वर शेवटची नजर टाकत म्हणले.
‘Please, मी तुम्हाला Facebook शिकवतो.’ तो रडत म्हणला,डोळ्यात पाणी आणण्यासाठी जास्त efforts घ्यायची गरज नव्हती, कांदा, कधी शेतकऱ्यांना रडवतो कधी मध्यम वर्गाला, आज एक विद्यार्थी रडत होता.
‘नाही एवढे पैसे नाही आपल्याकडे.’ ते थोडे थांबत म्हणाले , Facebook चा विचार करत होते.
‘मला खुप छान मार्क-स आहे CET मध्ये, I may get a prestigious college.’ तो आव आणत म्हणला.
‘बापाला इंग्रजी. ते काय पण असो, I don’t care.’ अप्पाने रूद्र ला केराची टोपली दाखवली, care वर जोर देत.

‘तो रम्या, त्याला 40% आहे तरीही त्याने engineering चा form भरलाय. मग मी का नाही? माझा तर नंबर आलाय…!!!’ रूद्र आता थोडा गंभीर होत पुटपुटला .
‘त्याचा बापा कडे पैसा आहे खुप, आणि 12,000/- फी असेल ना तर मी पण भरले असते.’ अप्पा पेपर वर राग काढत म्हणाले.
‘12000/- का?’ रूद्र कपाळावर आड्या आणत म्हणला.

आताच CET चा निकाल लागला होता, आणि जस म्हतारपणे सगळ्यालाच आपल्याला स्वर्गच भेटावा अस वाटू लागत तसच काहीतरी CET त पास झाल्यावर सर्वांना engineer होऊ वाटत. रूद्र पण अपवाद नव्हता, पण त्याला खरोखरच खूप छान मार्क होते, पण money talks, पैसा बोलतो. त्याच्या अप्पा कडे एवढा पैसा नव्हता की ते त्याचा खर्च पेलू शकले असते.
‘तो काय म्हणे Reserved आहे, cast मध्ये, त्यामूळे.’ अप्पा तोंड लपवत म्हटले.
‘का? मी नाही विचारली कधी त्याची जात..!!! तुम्हाला बर माहीत?’ रूद्र रडत म्हणला.
‘एवढ तर माहिती असल ना, की आपल्याला पूर्ण फी भरावी लागते, general आहे बेटा आपण. लाख रुपये नाही माझ्याकडे माफ कर आणी जा’ अप्पा पण पलतट म्हणाले.

‘EBC भेटेन आपलयाला …’ मी खुप अभ्यास करेल, ह्याच दिवसासाठी मी ए्वठा अभ्यास केला होता का?’ तो डोळे पुसत म्हणला.
‘हो, EBC म्हणजे दहाव्याच जेवण तेराव्याला देन. काही फरक पडत नाही. जा ते Agri चा form भर.’ अप्पा घिश्यात हात घालत म्हणाले.
‘माझे मार्क-स……!!!!!’ रुद्र पुटपुटला.
‘तुझे मार्क्स….. ? ‘

कोणाला फरक पडणार आहे, एका धर्मनीरेपेक्ष लोकशाही देशात talent नाही तर cast matter करते, Isn’t it irony बेटा??’ अप्पा, एक पदवीधर पण शेतकरी पाय आदळत शेताकडे निघाले.

‘Come-on अप्पा……..!!!!!’ रुद्र ओरडला.

(It has written in a sarcastic way, i don’t have any intention to talk about casts and religion. Reservation Should be continued but Every general category student doesn’t have to be rich and Every minority is not so poor as well.)